|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सिग्मा लेबोरटीस कंपनीचे नुकसान 20 कोटीहून अधिक

सिग्मा लेबोरटीस कंपनीचे नुकसान 20 कोटीहून अधिक 

प्रतिनिधी/ म्हापसा

करासवाडा औद्योगिक वसाहतीतील सिग्मा या औषध निर्मिती कंपनीला लागलेलया आगीत 20 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वीच कंपनीचा वेगळा नवीन प्लांट तयार करण्यात आला होता. आतमध्ये औषधे बनविणारी अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली होती. ती पूर्णतः जळून खाक झाली. या प्रकल्पात एक्सपान्शन युनिट बसविण्यात आले होते. त्याची एकाची किंमत 2 कोटीच्या घरात जाते. सकाळी अग्निशामक दलाचे पणजी विभागीय अधिकारी अजित कामत यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व याबाबतचा अहवाल तयार केला आहे. गेल्या पाच वर्षातील ही नुकसानीची सर्वात मोठी घटना असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी दिली. यावेळी म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्रांव उपस्थित होते.

या कंपनीच्या तळमजल्यावर 12 एअर हायड्रॉनिक कक्ष, 2 इलेक्ट्रिक पॅनल होते. एका हायड्रॉनिक कक्षाची किंमत सुमारे 30 लाखाच्या घारात जाते. हा प्रकल्प एकूण 25 कोटी रु.चा होता. त्यात सर्व मशिनरींचा समावेश होतो. आतमध्ये टाईल्स बसविण्याचे काम सुरु होते. तीन एक्पोर्ट एक्सपान्शन युनिट होते. त्यातच आग लागल्याने येथील सर्व मशिनरी जळून खाक झाल्याची माहिती  साहाय्यक विभागीय अदाकारी अजित कामत यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

प्रिया कोलागी या सिग्मा लोबोरटरीस प्रा. लि.च्या संचालक असून करासवाडा औद्योगिक वसाहतीत सिग्मा औषध निर्मिती कंपनीनंतर त्याच्या बाजूलाच त्यांनी सिग्मा लेबोरटीस हा प्रकल्प सुरु करणार होत्या. आतमध्ये मशिनरी बसविण्यात आली होती मात्र प्रकल्प सुरु केला नव्हता. रविवारी लागलेल्या आगीत सिग्मा औषध कंपनीमध्ये मोठे आगीचे लोळ गेल्याने रसायनिक प्रदार्थ जळाले असून कोटय़वधीचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.

या प्रकल्पामध्ये एक्सपान्शन युनिट बसविण्यात आले होते मात्र हे बसविताना अग्निशामक दलाचा ना हरकत दाखला घेण्यात आला नव्हता, अशी माहिती हाती आली आहे. अग्निशामक दलाच्या अधिकारी वर्गाने वीज खाते व पोलिसांना पत्र लिहून आगीमागचा अहवाल देण्यास सांगितल्याची माहिती बॉस्को फेर्रांव यांनी दिली. आगीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.