|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ईव्हीएम मशिन आधुनिक मतदानासाठी खूप गरजेचे

ईव्हीएम मशिन आधुनिक मतदानासाठी खूप गरजेचे 

प्रतिनिधी/ पणजी

 आधुनिक मतदान प्रक्रीयेसाठी ईव्हीएम यंत्रे व व्हीव्हीपीएटी यंत्रांची खूप गरज आहे. त्यासाठी आता संपूर्ण भारतभर ईव्हीएम मशिनद्वारे मतदान केले जात आहे. खूप सुरक्षित व नवीन तंत्रन्यानातून तयार केलेले हे मतदान यंत्र आहे, असे यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी काल पत्रकरांना ईव्हीएम मशिन विषयी माहिती देताना सांगितले.

 सध्या लोकासभेच्या निवडणूकांची तयारी सुरु झाली असून काल मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी आपल्या कार्यालयात ईव्हीएम मशिन विषयी पत्रकारांना महिती देण्यात आली. तसेच या विषयी सादरीकरण करण्यात. ईव्हीएम मशिन हे पूर्वीच्या मतदार बॅलेट पेपर पेक्षा अंत्यत चांगले आहे. हे मशिन संपूर्ण जीपीएस पद्धतीने पूर्ण आहे. कुणीच याचा दुरुउपयोग करु शकत नाही. त्याचप्रमाणे मतदानवेळी कुणीही आपल्या मतदाचा गैरफायदा तसेच दोन वेळा मतदान करु शकत नाही. त्याचप्रमाणे या मशिनवर जर एखादा गैरकारभार केला तर याची माहिती अधिकऱयांना मिळते. मतदान झाल्यावर हे मशिन 24 तास पोलिसांच्या नजरेखाली ठेवले जाते. मतदाराने मतदान केल्यावर लगेच आवाज येतो. त्याचप्रमाणे व्हीव्हीपएटी यंत्रात एक पावती दाखविली जाते.

 ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान करणे आता खूप गरजेचे आहे. अनेक देशामध्ये याचा वापर केला जातो. यामुळे वेळ तसेच कामगारांची संख्याही कमी असते. फक्त दोनच अधिकारी हे मशिन सांभाळू शकतात. त्याचप्रमाणे हे मशिन पूर्णपणे बॅटरीवर चालणारे असल्याने याला विजेची गरज नसते. त्यामुळे जर वीज गेली तरी मतदान थांबणार नाही. त्याचप्रमाणे या मशिनवर सुमारे 15 बटन्स आहे व एक नाटाचे बटन आहे. जर 7 उमेदवार असेल तर दुसरी सात बटन्स बंद केली जातात. त्यामुळे या मशिनचा मतदानासाठी आम्ही कुठेच गैरफायदा होऊ शकत नाही. सुरक्षतेच्या बाबतीत खूपच चांगल असे हे मतदान यंत्र आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सागितले. यावेळी अन्य निवडणूक अधिकारी उपस्थित हाते.