|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिरोडय़ातून संतोष सतरकर यांना उमेदवारी

शिरोडय़ातून संतोष सतरकर यांना उमेदवारी 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा सुरक्षा मंच पक्षातफ्xढ मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या तिन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक लढविण्यात येईल तसेच लोकसभेच्याही दोनी जागा लढविण्यात येणार आहे. मांद्रे मतदारसंघातून पोटनिवडणुकीत स्वरुप जयदेव नाईक आणि शिरोडा मतदारसंघात संतोष पंढरी सतरकर यांची उमेदवार पदासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा गोवा सुरक्षा मंच पक्षप्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली.

यावेळी पत्रकार परिषदेत गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आत्माराम गांवकर, उपाध्यक्ष गोविंद देव, स्वरुप नाईक, गोसुमं मांद्रे महिला अध्यक्ष शिल्पा म्हामल, भारत माता की जय संघटनेचे संरक्षक प्रा. गजानन मांद्रेकर, संतोष सतरकर, गोसुमं मांद्रेचे कार्याध्यक्ष राया नाईक व इतरांची उपस्थिती होती. गोवा सुरक्षा मंचतफ्xढ जे उमेदवार निवडण्यात येईल ते नवीन चेहरे असणार आहे. त्यांच्याकडे किती पैसे आहेत हे न पाहता त्यांची समाजात चांगली ओळख आहे की नाही तसेच ते समाजसेवक आहेत की नाही हे पडताळून या निकषांवरच उमेदवारी देण्यात येईल असे प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले.

प्रसंगी प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले की, मांद्रे व शिरोडा येथील कार्यालयांचे उद्घाटन पक्षप्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याहस्ते करण्यात येईल. मांद्रे कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दि. 13 रोजी तर शिरोडा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार दि. 14 रोजी होणार आहे. कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर लगेच प्रचाराला अधिकृतरित्या सुरुवात केली जाईल.

स्वरुप नाईक यांनी सांगितले की, मांद्रेतील जनतेने दयानंद सोपटे यांना निवडून दिले होते पण त्यांनी एका पक्षातून दुसऱया पक्षात जाऊन लोकांचा विश्वासघात केला. ज्याप्रमाणे लक्ष्मिकांत पार्सेकर यांना धडा शिकविला तसाच धडा सोपटे यांनाही मांद्रेतील स्वाभीमानी जनता शिकवणार आहे. मांद्रेतील जनतेला पर्याय हवा होता व तो पर्याय गोवा सुरक्षा मंचने दिल्याचेही ते म्हणाले.

बॉक्स करणे

गोसुमंचे खासदार पदासाठीचे उमेदवार 19 रोजी जाहीर

प्रा. वेलिंगकर म्हणाले की, म्हापसा मतदारसंघातील गोवा सुरक्षा मंच उमेदवाराच्या नावाची घोषणा रविवार दि. 17 रोजी आणि लोकसभेसाठीच्या उत्तर व दक्षिण अशा दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा मंगळवार दि. 19 रोजी करण्यात येईल. भाजपचे सध्याचे खासदार हे गोव्याचे प्रश्न व समस्या लोकसभेत मांडण्यास अपयशी ठरले आहेत त्यामुळे त्यांना धडा शिकवायलाच हवा. आमचे खासदार हे प्रधानमंत्री मोदींना सहकार्य करतील असेही ते म्हणाले.