|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पिळर्ण-मार्रा पंचायतीची स्वच्छता मोहीम कौतुकास्पद

पिळर्ण-मार्रा पंचायतीची स्वच्छता मोहीम कौतुकास्पद 

पर्वरी दि.11 : (प्रतिनिधी)

पिळर्ण -मार्रा पंचायत कार्यालयाने हाती घेतलेली स्वच्छता मोहिम कौतुकास्पद आहे.  त्यांनी स्वच्छता अभियानांतर्गत पिळर्ण गावातील लोकांना स्वच्छते संदर्भात केलेले मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कृती वाखाणण्याजोगी आहे आणि त्यामुळेच पिळर्ण-मार्रा पंचायतीला गोवा प्रदेशातील ” स्वच्छ पंचायत पुरस्कार ” प्राप्त झाला आहे असे गौरवोद्गार बांगलादेश चे ग्रामीण विकास मंत्री मोहमद ताझूल इस्लाम यांनी काढले.   मंत्रीमहोदय ताझूल इस्लाम आणि त्यांच्या सोबत आलेल्या पाहणी मंडळातील सदस्य वेस्ट मेनेजमेण्ट प्रमुख एम.ए.रजाक, अतिरिक्त सचिव डॉ.काझी हक,  मेहबूब हुसेन यांनी पिळर्ण पंचायत क्षेत्रात फिरून आढावा घेतल्यानंतर पंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.  यावेळी पिळर्ण पंचायतीचे सरपंच अजय गोवेकर,  पंच सदस्य संदीप बांदोडकर, सॉलिड वेस्ट मेनेजमेण्ट चे अभियंता  धीरज चोडणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

पंचायत क्षेत्रातील विकास कामांची आणि स्वच्छता अभियानाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पंचायत मंडळाच्या कार्यक्षमतेचे कौतुक करून गोमंतकीय पाहुणचाराबद्दल आभार मानले.