|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हा तर श्रमलक्ष्मींचा सन्मान : भारत सासणे

हा तर श्रमलक्ष्मींचा सन्मान : भारत सासणे 

प्रतिनिधी / पणजी

‘ज्या महीलांचे सत्कार करण्यात आले आहे त्या श्रमलक्ष्मी आहेत. त्यांचा सत्कार होणे आवश्य होते. स्त्रीया या समाजाचा कणा आहेत. तो जर कणखर नसेल तर समाज ढसळतो असा इतिहास सांगितला जातो. संकटाला सामोरे जाऊन पुन्हा एकदा नवनिर्मिती करण्याची ताकद ही स्त्रीमध्ये ’असते, असे प्रख्यात मराठी साहित्यिक भारत सासणे यांनी सांगितले.

आपल्यापेक्षा आर्थिक, सामाजिक व इतर सर्वच दृष्टीने कमी असलेल्या महीलांचा सत्कार होणे गरजेचे असते. त्यांच्या कामाची ती एक चांगली पोचपावती असते. आपल्या कामाची इतरांनी दखल घेतली तर आपले कार्य हे समाजासाठी महत्वाचे असल्याने सत्कारमुर्तींनादेखील आनंद होतो. प्रत्येकाने आपला थोडा वेळ तरी समाजाला द्यावा. ज्याला जशी शक्य होईल त्याने ती मदत नक्कीच करावी असे उद्गार डॉ. नूतन देव यांनी काढले.

गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी आणि माधव राघव प्रकाशन ताळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महीला दिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, गोसासेचे अध्यक्ष रमेश वंसकर, माधव राघव प्रकाशनच्या चित्राम क्षिरसागर यांची उपस्थिती होती.

 

याप्रसंगी समाजाचा विविध अंगाने सेवा करणाऱया महीलांचा डॉ. नूतन देव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये राजश्री शिरगुपे, साधना गायकवाड आणि शुभलक्ष्मी रायकर यांचा समावेश होता. त्यांना शाल आणि श्रीफ्ढळ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान डॉ. नूतन देव यांचाही गौरव करण्यात आला. सर्व सत्कारमुर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.