|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेससोबत चर्चेचे पर्याय संपले,पुढे जाणे शक्य नाही : प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत चर्चेचे पर्याय संपले,पुढे जाणे शक्य नाही : प्रकाश आंबेडकर 

ऑनलाईन टीम / अकोला :

काँग्रेसबरोबर चर्चेचे सर्व प्रस्ताव संपले आहेत. त्यामुळे काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणे शक्य नाही, अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

“आम्ही 22 उमेदवार मागे घेऊ शकत नाही. 15 तारखेला संपूर्ण 48 जागांचे उमेदवार जाहीर करु,” असेही आंबेडकरांनी जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेसह प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.