|Friday, December 6, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

23 मार्चला राहू केतूचे राश्यांतर…. पूर्वार्ध

बुध. दि. 13 ते 19 मार्च 2019

 येत्या 23 मार्चला राहू त्याच्या उच्च असलेल्या मिथुन राशीत तर केतू धनू राशीत प्रवेश करील व आगामी दीड वर्षे तेथे त्याचे वास्तव्य असेल. राहू, केतू बदलाच्या तारखा वेगवेगळय़ा पंचांगात निरनिराळय़ा दिलेल्या आहेत. आकाशगंगेत प्रत्यक्षात  न दिसणारे पण जबरदस्त  अनुभव देणारे छेदनबिंदू म्हणजे राहू व केतू. प्रत्यक्षात हे ग्रह नाहीत, चंद्राची कक्षा व क्रांतीवृत्त छेदणारे व परस्परात 180 अंश अंतर  असणारे हे दोन पातबिंदू आहेत. सर्व तऱहेची कपटकारस्थाने, क्षणार्धात होत्याचे नव्हते करणारा, आकाशातील विजेचा लोळ, सी.आय.डी., लोखंडावर चढणारा गंज, प्लास्टिक  कारखाने सर्व प्रकारचे शाप, अफवा, खोटे व जीवघेणे मेसेजेस, वेडसरपणा या साऱयावर या राहुचा अंमल असतो. चांगल्यातले चांगले काम व वाईटातले वाईट काम तो मनुष्यप्राण्याकडून करवून घेतो. अमानुष बलात्कार, चोऱयामाऱया, मोठमोठे दरोडे, जत्रा-यात्रा अथवा यज्ञात दिले जाणारे मूक पशू, पक्ष्यांचे बळी व त्याचा शाप राहूच निर्माण करतो व त्याचे शापीत परिणाम भोगावयास लावतो. त्यातून कुणाची  सुटका नाही. यासाठी या जत्रा-यात्रांवरच कायद्याने बंदी घातली तरच हे बळी देण्याचे प्रकार थांबतील. नाशिकजवळील सप्तश्रृंगी देवस्थान प्रशासनाने तर जे कुणी देवीच्या नावाने बळी देतील, त्यांच्यावर कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे. असा कायदा देशभर होण्याची गरज आहे. बळी देताना त्या प्राण्याचे होणारे हाल, अत्यंत प्रखर शाप निर्माण करतात. जे लोक असे बळी देण्यास सांगतात, त्यांचाच बळी दिला पाहिजे. यज्ञ करणारे काही याज्ञिकदेखील यज्ञात मुक्मया प्राण्यांची बळी देण्याची प्रथा आहे, असे सांगत असतात. अशा लोकांनी आपल्या मुलांचा बळी का देऊ नये? हे पूर्ण चुकीचे, अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद केली तरच या बळी देण्याच्या प्रकारावर अंकुश बसेल. संपूर्ण जीवसृष्टी तसेच मानवी जीवनावर या राहुचा फार परिणाम होतो. कालसर्पयोग, भूतबाधा, पिशाच्चबाधा, मृतात्मे व पूर्वजांची अवकृपा दर्शविणाऱया या दोन बिंदूना ग्रहमालिकेत महत्त्वाचे स्थान आहे. पत्रिकेत ज्या स्थानी हे बिंदू पडतात तेथे काही तरी गडबड, गेंधळ व खळबळ निश्चितच माजवितात. राहू, केतू शुभ असतील तर राजयोगासारखे शुभ फळ देतात. अध्यात्मात उच्च प्रगती होण्यास सहाय्यक ठरतात. जगाचे कल्याण करणाऱया संत रामदास, गजानन महाराज, स्वामी समर्थ, संत ज्ञानेश्वर, टेंबेस्वामी, गोंदवलेकर महाराज, येशू, ख्रिस्त, संत बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, छ. शिवाजी महाराज यासारख्या विभुती राहू बलवान असेल तरच जन्माला येतात व हे दोन्ही ग्रह अशुभ असतील तर जगणे नकोसे करतात. हालहाल होऊन मृत्यू आणतात व जगाला त्रास देणाऱया व्यक्ती जन्माला येतात. या दोन पातबिंदूंचे हे गुणधर्म पाहूनच ग्रहमालेत त्यांना ग्रहांचे स्थान देण्यात आलेले आहे. हे ग्रह माणसाला त्याच्या कर्माचे योग्य ते फळ देत असतात. वेळ येताच घमेंडीचा चुरा करतात. घराण्यातील बऱयावाईट कर्माचा हिशोब करून तो या जन्मात पाठविण्याचे कार्य हे दोन बिंदू करीत असतात.

मेष

राहू तृतियात येत आहे. कितीही कडक व कपटी शत्रू असले तरी त्यांचे काही चालणार नाही. आर्थिक बाबतीत शुभ, पण भावंडांच्या बाबतीत अनिष्ट, त्यासाठी भावंडांची काळजी घ्यावी. सर्व काही सुरळीत चालले असताना अचानक संन्यास घ्यावासा वाटणे, घरदार सोडून दूर जावे लागणे, काही तरी प्रकरण अंगलट येणे, असे प्रकार आगामी दीड वर्षात घडतील.


वृषभ

राहू धनस्थानी येत आहे. कितीही बुद्धिमान असलात तरी हातून चुका होतील. सासुरवाडीच्या लोकांसाठी हा राहू अशुभ. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी. कोठेही गुंतवणूक करताना जपावे लागेल. अचानक जिवावरचे संकटे येणे, श्वास अडकणे, चुकीची शस्त्रक्रिया, जिवावर बेतणे असे प्रकार आगामी दीड वर्षात घडतील.


मिथुन

 राहू तुमच्या राशीत येत आहे. सर्व बाबतीत अस्थिरता दिसून येईल. या राहुच्या कालखंडात निळे, काळे कपडे व वस्तू वापरू नयेत, पण गाडी वगैरे या रंगाची असेल तर वाहन जपून चालवा. शापीत योगाची सुरुवात होत आहे. वैवाहिक जीवनात अतिमहत्त्वाच्या घटना घडतील. आगामी दीड वर्षे त्या दृष्टीने महत्त्वाची ठरतील. सर्व बाबतीत काळजी घ्यावी.


कर्क

राहू अनिष्ट स्थानी येत आहे. झोपेचे विकार उद्भवतील. डोळय़ांची काळजी घ्या. कोर्ट केस व पोलीस प्रकरणे होणार नाहीत, यासाठी जपावे. या राहुच्या कालखंडात योगाभ्यास, त्राटक, शीर्षासन असे प्रकार करू नका. गुप्त शत्रुत्व, शारीरिक पीडा, मानसिक संभ्रम,  करणीबाधा, वगैरेची शक्मयता राहील. आगामी दीड वर्षे हे ग्रहमान राहील. काळजीपूर्वक वागावे.


सिंह

राहू लाभात येत आहे. मोठय़ा प्रमाणात धनलाभ, परदेश प्रवास, मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. स्वत:ची वास्तू होईल. पिता व आजोबांच्या बाबतीत त्रासदायक. राहुच्या या कालखंडात जर मुलबाळ झाल्यास आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. वंशपरंपरेने हाती आलेल्या मालमत्तेसंदर्भात घोटाळे माजतील. राजयोग, आर्थिक स्थिती या बाबतीत चांगले अनुभव येतील.


कन्या

राहू दशमात राजयोगात येत आहे. नोकरी, व्यवसाय, धनलाभ, नोकरीत उच्च पद, राजकारणात प्रवेश, मान-सन्मान, प्रति÷sत वाढ होईल. पण वास्तुदोष निर्माण करणारे ग्रहमान आहे. कुणाही अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देताना काळजी घ्या. करणीबाधा, शत्रुत्व यांची शक्मयता राहील. राहू चांगला असल्याने नोकरी व्यवसायात प्रगतीचे वारे दिसू लागेल. आगामी दीड वर्षे हे परिणाम राहतील.


तुळ

भाग्यात राहू येत आहे. नास्तिकता वाढेल. मान, आदर, प्रति÷ा यांना थकवा पोचण्याची शक्मयता आहे. त्यासाठी जपून रहा. अपमान, अनादर यांना सामोरे जावे लागेल. या राहुच्या कालखंडात जमिनीखाली पाण्याची टाकी बांधू नका. निळे व काळय़ा रंगाचे कपडे वापरू नयेत. कोर्टकचेऱया व खोटय़ा साक्षी, तंटेबखेडे यापासून दूर रहा. हे परिणाम आगामी दीड वर्षांपर्यंत टिकतील.


वृश्चिक

बदलणारा राहू आठव्या स्थानी व केतू धनस्थानी येत आहे. आगामी दीड वर्षे तुम्ही सर्व तऱहेच्या बाधिक पीडा व विषारी अन्न व पदार्थापासून सांभाळावे. आर्थिक घोटाळे माजू शकतात. सर्व कामात  अडथळे, भांडणतंटे, आजार, धनहानी, फसवणूक, अपघात, दुर्घटना असे प्रकार घडतील. त्यासाठी कोठेही गुंतवणूक करताना काळजी घ्या. वेळात वेळ काढून रोज अथवा राहुच्या नक्षत्रावर राहुचा जप करीत रहा. काहीही त्रास होणार नाही.


धनु

 राहु सप्तमस्थानी येत आहे. या योग आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही. अचानक नको त्या व्याधी निर्माण होतील. तसेच प्रति÷sलाही धोका होऊ शकेल. वैवाहिक जीवनात वादावादी, मतभेद, घटस्फोट, गैरसमज यांना थारा देऊ नका. चमत्कारीक घटना घडतील. या काळात राहुच्या स्तोत्राचे पाठ करा. काही अडचणी आल्या तरी त्यातून सुटका होईल. दीड वर्षे याच कालावधी राहील. या काळात राहुच्या मंत्राचा जप करा.


मकर

राहू प्रिती षडाष्टकात येत आहे. सर्व तऱहेच्या धोक्मयापासून सांभाळा. अनोळखी ठिकाणी खाणेपिणे करताना काळजी घ्या. गुप्त शत्रुंच्या कारवाया वाढतील. धनलाभ, मनोकामना, पूर्ती, संकटातून सुटका अशा शुभ घटनाही घडतील. पण नजरबाधा वगैरेची शक्मयता आहे हे सारे अनुभव आगामी दीड वर्षाच्या कालखंडापर्यंत टिकतील.


कुंभ

राहू पंचमात शापीत योगात आहे. आगामी दीड वर्षात त्याचे शुभाशुभ परिणाम जाणवतील. सर्पहत्या व पितरांच्या दोषाचे परिणाम प्रकर्षाने जाणतील. पुत्र संततीची काळजी घ्या. शिक्षणात अडथळे येण्याची शक्मयता आहे. बेफिकीर राहू नका. केतू मात्र लाभदायक आहे. धनलाभाच्या दृष्टीने चांगले योग. कोणत्याही मुक्मया प्राण्याची हत्या अथवा वृक्षतोड यापासून दूर रहा.


मीन

राहू चतुर्थात येत आहे. वास्तुदोष निर्माण होणाऱया घटना घडतील. यावषी घर, जागा, दुकान घेताना ते बाधिक असण्याची शक्मयता आहे. त्यासाठी सावध रहावे. नोकरी, व्यवसायात अत्यंत चमत्कारीक घटना घडतील. वाहनसुख, घरदार या बाबतीत भाग्यवान. आईला त्रास होईल, असे वर्तन करू नका, अन्यथा राहुचे अनिष्ट परिणाम होतील हे अनुभव दीड वर्षापर्यंत राहतील.

Related posts: