|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रज्नेश, बोपण्णा यांचे आव्हान समाप्त

प्रज्नेश, बोपण्णा यांचे आव्हान समाप्त 

वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया

एटीपी टूरवरील इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा प्रज्नेश गुणेश्वरन तसेच रोहन बोपण्णा यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेत भारताचा नवोदित प्रज्नेश गुणेश्वरनने एकेरीच्या तिसऱया फेरीतपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत प्रथमच आपला सहभाग दर्शविताना त्याने पहिल्या फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या पेरीचा तर दुसऱया फेरीच्या सामन्यात बॅसिलासेव्हिलीचा पराभव केला होता. मात्र तिसऱया फेरीतील सामन्यात क्रोएशियाच्या कार्लोविकने प्रज्नेशचा 75 मिनिटांच्या कालावधीत 6-3, 7-6 (7-4) असा पराभव करत चौथी फेरी गाठली. या स्पर्धेत चेन्नईच्या प्रज्नेशला 48775 डॉलर्सची रक्कम बक्षिसादाखल मिळाली. प्रज्नेशला या स्पर्धेत 61 मानांकन गुण मिळाले असून एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत तो आता 82 व्या स्थानावर राहील. पुरूष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णाचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले. सर्बियाचा जोकोव्हिक आणि इटलीचा फॉगनेनी या जोडीने रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार शेपोव्हॅलोव्ह यांचा 4-6, 6-1, 10-8 असा पराभव केला.

 

Related posts: