|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पं. उपेंद्र भट यांची शनिवारी गायन मैफल

पं. उपेंद्र भट यांची शनिवारी गायन मैफल 

बेळगाव :

 लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्राच्यावतीने शनिवार दि. 17 रोजी सायंकाळी 6 वाजता पं. उपेंद्र भट यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रोत्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या दमदार गायकीचा वारसा काही शिष्यांना सोपविला. त्यापैकी पं. उपेंद्र भट हे एक आहेत. शास्त्रीय गायनाच्या बरोबरीने उपशास्त्रीय गायन आणि भजन, अभंग अशा गायन शैलीमध्ये देखील त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे त्यांचा खास श्रोतृवर्ग निर्माण झाला आहे. रसिकांना त्यांच्या सुश्राव्य गायनाची पर्वणी लाभणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.