|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » अझीम प्रेमजांचे 52,750 कोटींचे शेअर्स समाजकार्याला

अझीम प्रेमजांचे 52,750 कोटींचे शेअर्स समाजकार्याला 

वृत्तसंस्था /बेंगळूर :

भारतात आयटी क्षेत्रात तिसऱया क्रमांकाची सर्वात प्रसिद्ध कंपनी म्हणून विप्रो कंपनीला ओळखले जाते. या कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी आपल्या मालकीचे 34 टक्के शेअर्स समाजकार्याला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शेअर्सची रक्कम 52 हजार 750 कोटी रुपये होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. विप्रो कंपनीच्या अंतर्गत अनेक प्रकारे करण्यात येणाऱया समाजकार्यासाठी कंपनीचा पुढाकार आहे. प्रेमजी फाउंडेशनच्या अंतर्गत चालवण्यात येते. असून आतापर्यंत 1.45 लाख कोटी रुपये निधी दिलेला आहे.

समाजकार्यात सक्रीय राज्ये

कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगढ, तेलगंणा, पुडुचेरी, मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व राज्यामध्ये या फाउडेशनकडून काम सुरु असल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.