|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » अतिसारामुळे सायनाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला

अतिसारामुळे सायनाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारताची प्रमुख महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तिला अतिसाराचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी हा सल्ला दिला असून याच कारणासाठी तिने सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या स्विस ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे.

सायनाने अलीकडेच झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी पोटदुखीचा त्रास सहन करतच खेळ केला होता. बुधवारी तिने आपल्या इन्स्टाग्रमा पेजवर या संदर्भात माहिती दिली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रेक घेणार असल्याचे आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन त्यावर उपचार घेणार असल्याचे तिने सांगितले आहे.

‘गेल्या सोमवारपसून पोटदुखीचा खूपच त्रास होत आहे. ही दुखापत घेऊनच ऑल इंग्लंड स्पर्धेतील काही सामन्यांत भाग घेतला होता. त्यानंतर स्विस ओपनमधून माघारीचा निर्णय घेत मायदेशी परतले. त्याची तपासणी करून घेतल्यानंतर निश्चित निदान झाले आहे. डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेण्याची शिफारस केली असून मी लवकरच यातून बरी होईन, अशी मला आशा वाटते,’ असे तिने इन्स्टाग्राम पेजवर लिहिले आहे.

Related posts: