|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तिकीटासाठी भाजपमधून जोरात लॉबिंग

तिकीटासाठी भाजपमधून जोरात लॉबिंग 

प्रतिनिधी /बेळगाव :

लोकसभा निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले असले तरी अद्याप कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार निश्चित केलेले नाहीत. उमेदवारांबद्दल अधिकृत घोषणा व्हायची आहे. भाजपानेही यावेळी आपला उमेदवार कोण असणार? हे स्पष्ट केलेले नाही. सलग 3 वेळा बेळगावचे खासदार होण्याची संधी मिळालेले सुरेश अंगडी यांना यावेळी पुन्हा उमेदवारी देऊ नका, अशी मागणी पक्षातूनच वाढू लागली आहे. यामुळे इतर इच्छुकांची संख्याही मोठी होत असून चेहरा बदल करा या मागणीसाठी लॉबिंग सुरू आहे. भाजपमधील अनेकांच्या बेंगळूर व दिल्ली येथील वाऱया वाढल्या आहेत.

सलग तीन वेळा खासदार झालेले सुरेश अंगडी पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळणार या विश्वासात आहेत. त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. मात्र, सर्वत्र मागील 15 वर्षे कोठे होता? असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे. भाजपला समर्थन देणाऱया नागरिकांनी सोशल मिडीयावरून अंगडी यांना बदला, अशी मागणी सुरू केलीच आहे. गल्लोगल्लीतही असाच अनुभव अंगडी यांना येत आहे. त्यातच पक्षांतर्गत विरोधक वाढून त्यांचे इच्छुकात रुपांतर झाल्यामुळे स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत भाजप कोणाचे नाव जाहीर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून त्यावर काँगेसही आपला उमेदवार ठरवणार असल्याने अद्याप शांत आहे.