|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » वनस्पती तेल आयातीत 7.40 टक्क्यांनी वाढ

वनस्पती तेल आयातीत 7.40 टक्क्यांनी वाढ 

फेबुवारी महिन्यातील आयातीची आकडेवारी सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील एकूण आयात क्षेत्रातील रिफायनरी  तेलाच्या आयातीत वाढ होत आहे. वनस्पती तेलाच्या आयातीत फेब्रुवारीत 7.40 टक्क्यांनी वाढ होत  12.40 लाख टनावर पोहोचल्याची माहिती उद्योग संघटना एसईए यांच्याकडून सादर केलेल्या माहिती आधारे सांगण्यात आले आहे. मुख्यतःहा वनस्पती तेलामध्ये  खाद्यतेल आणि अखाद्य तेल असे दोन प्रकारच्या तेलाचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

तेल वर्ष

तेल व्यापार वर्ष नोव्हेबर-ऑक्टोबर या कालावधीत गणले जाते. या वर्षांच्या आधारेच सॉल्वेंट एक्सट्रक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए)कडून मिळालेल्या माहितीनूसार आकडेवारी पुढीलप्रमाणे :

वनस्पती तेलाची आयात चालू वर्षातील फेब्रुवारीमध्ये 12,42,533 टन राहिले. हाच आकडा मागील वर्षातील फेबुवारीत 11,57,044 टनावर राहिला होता. यातून आयात करण्यात आलेल्या खाद्यतेलात 11,24,999 टनानी वाढ होत 11,82,062 टन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अखाद्य तेलाची आयात 32,045 टनावरुन वाढत जात 60,471 टनाचा टप्पा गाठला आहे.

आयात शुल्क कपात

जानेवारी 2019मध्ये पामतेलावर आकारण्यात येणाऱया आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे आयातीमध्ये असणारे अंतर 10 टक्क्यांनी घट होत. पाच टक्क्यावर पोहोचल्याची माहिती वित्त मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आधारे सांगण्यात आली आहे.