|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » ब्रुकफील्डकडून-रिलायन्स पाईपलाईनमध्ये लवकरच व्यवहार

ब्रुकफील्डकडून-रिलायन्स पाईपलाईनमध्ये लवकरच व्यवहार 

सदरची खरेदी 13 हजार कोटींना : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टकडून अधिग्रहण होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील सर्वात प्रसिद्ध कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या ईस्ट-वेस्ट पाईपलाईन लिमिटेडची जवळपास 13 हजार कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. ही खरेदी कॅनडाची इन्वेस्टमेन्ट कंपनी बुकफील्डकडून  हा व्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या व्यवहारात 90 टक्के हिस्सेदारी असणारी कंपनी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यवहारातील इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टला बुकफील्डने प्रायोजित केले आहे.

पाइपलाईनची आरक्षित क्षमतेत घट

सध्याच्या होत असणाऱया व्यवहाराचे करारपत्र तयार करताना पाइपलाईनची असणारी आरक्षित क्षमतेमध्ये प्रतिदिन 56 दशलक्ष मॅट्रीक मीटरने घट करून 33 दशलक्ष मॅट्रीक क्यूबिक मीटर करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

पाइपलाईन तोटय़ात

आंध्रपदेशमधील काकीनाडा या ठिकाणाहून सुरु झालेली ही पाईप गुजरातच्या भरुच या ठिकाणापर्यंत पोहोचली आहे. परंतु ईस्ट-वेस्ट पाइपलाईन इन्फ्रास्ट्रक्चर तोटय़ातच आहे. कारण यांची क्षमता फक्त 5 टक्के गॅस पुरवठा करण्याची क्षमता राहिल्यानेच हा प्रकल्प तोटय़ात आहे.

 

   ईस्ट-वेस्ट पाइपलाईन?

ई&स्ट-वेस्ट पाइपलाईन लिमिटेडचे पूर्वीचं नाव रिलायन्स गॅस ट्रार्न्स्पेर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे होते. त्याची लांबी 1400 किलोमीटर लांब आकाराची पाईपलाईन विस्तारली आहे. याच्या आधारेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे केजी बेसिन ब्लॉकचा नॅचरल गॅसचे ट्रान्सपोर्ट केले जायचे.