|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » टोयोटाच्या काही मॉडेल्सच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज

टोयोटाच्या काही मॉडेल्सच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज 

एप्रिल महिन्यात किंमतीत वधार शक्य :

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटार यांच्याकडून उत्पादन करण्यात येणाऱया वाहनांच्या किंमतीत येणाऱया महिन्यात वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनी आतापर्यंत करण्यात येणाऱया उत्पादनातून जादा खर्च सहन करत आहे. तरी येणाऱया काळात उत्पादन खर्च आणि अन्य गोष्टीचा ताळमेळ लागावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे संचालक एन राजा यांनी म्हटले आहे. सदर वाहनांच्या किंमतीत वाढ करण्यात येणाऱया मॉडेलची माहिती कंपनीकडून  देण्यात आली नाही.

अंदाज

कंपनीकडून किंमतीत वाढ करण्यात येणाऱया वाहनांमध्ये प्रसिद्ध मॉडेल इनोव्हा, स्पोर्ट्स युटिलिटी मॉडेल फॉच्यूनरचा  समावेश असण्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.