|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राष्ट्रीय मूल्यांकन समितीची गावठी आठवडा बाजारास भेट

राष्ट्रीय मूल्यांकन समितीची गावठी आठवडा बाजारास भेट 

वार्ताहर / कणकवली:

देशातील कृषी विद्यापीठांच्या राष्ट्रीय मूल्यांकन समितीने येथील गावठी आठवडा बाजारास भेट देऊन माहिती घेत प्रशंसेची मोहोर उमटविली. राष्ट्रीय मूल्यांकन समितीच्या सदस्यांनी गावठी माल उत्पादकांशी संवाद साधला.

कामधेनू विद्यापीठाचे माजी कुलगन्व समिती अध्यक्ष डॉ. मदनगोपाळ वार्ष्णेय, समितीचे दक्षिण भारत विभागीय समन्वयक डॉ. सी. के. नारायणा (बेंगळूर), डॉ. डब्ल्यू. धिल्लन (दिल्ली), एसकेआरएयूचे प्रमुख डॉ. वाय सुदर्शन (बिकानेर), रजिस्टार डॉ. ए. पी. शर्मा, असोसिएट डायरेक्टर डॉ. एम. के. झाला, प्रिन्सिपल सायंटिस्ट डॉ. के. पी. त्रिपाठी (नवी दिल्ली) आदी उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाच्या या राष्ट्रीय मूल्यांकन समितीने गावठी पदार्थांच्या खान-पानचा आनंद लुटला. याची आम्ही दखल घेत आहोत, असे यावेळी कामधेनू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाळ वार्ष्णेय यांनी सांगितले. यावेळी स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत, संदीप राणे, व्ही. के. सावंत, पंकज दळी, डी. आर. परब, युरेका क्लबच्या सुषमा केणी यांनी समिती सदस्यांचे स्वागत करून या उपक्रमाची माहिती दिली.