|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » मागणी वाढल्याने तांब्याच्या किमंतीत वाढ

मागणी वाढल्याने तांब्याच्या किमंतीत वाढ 

नवी दिल्ली

 देशांतर्गत बाजारात शुक्रवारी झालेल्या व्यवहारात वाढ झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांचा परिणाम म्हणून तांब्याच्या धातूची मागणी वधारत जात 0.48 टक्क्यांनी तेजी नोंदवत 447.30 रुपये प्रति किलोग्रॅम किंमतीची नोंद करण्यात आली. परंतु विदेशी बाजारातील कमजोर वातावरणाचा नफा कमाईत काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे दिसून आले. पण देशांतर्गत बाजाराच्या तेजीचा सकारात्मक परिणाम धातूच्या विक्रीवर शुक्रवारी झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील लंडनच्या धातू एक्सचेंज बाजारात तीन महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या तांब्याच्या किंमतीत 1.06 टक्क्यांनी घसरण होत 6,404 डॉलर प्रति टनावर राहिला आहे.