|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्सची झेप सहा महिन्यांच्या उच्चांकावर

सेन्सेक्सची झेप सहा महिन्यांच्या उच्चांकावर 

सेन्सेक्स 260 अंकानी मजबूत : बँकांची समाधानकारक कामगिरी

वृत्तसंस्था/मुंबई

सलग पाचव्या सत्रात भारतीय शेअर बाजारातील (बीएसई) सेन्सेक्सने मागील सहा महिन्यांतील सर्वोच्च उच्चांकीचा टप्पा शुक्रवारी पार केला आहे. सेन्सेक्स 269 अंकानी मजबूतीसह 38,024 वर बंद झाला आहे. यात बँकींगच्या शेअर्सची विक्री, विदेशी फंडाचा पुरवठा आणि रुपयातील डॉलरच्या तुलनेत झालेली मजबूत स्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेताचा झालेला भारतीय बाजाराला फायदा यामुळे सेन्सेक्सला सर्वोच्च झेप घेतल्याची नोंद करण्यात आली.

दिवसभरतील व्यवहारात दुपारी सेन्सेक्स 500 अंकाच्या जवळपास पोहोचत  38,000 चा टप्पा गाठला असून या अगोदर 14 सप्टेंबरध्ये 38,090.64 वर झेप घेतली होती त्यानंतर ही प्रथमच इतकी मोठी उसळी घेतली आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) निफ्टी 83.60 अंकानी वधारत 11,426.85 पर्यंत मजल मारत बंद झाला. बीएसई मिडकॅप 0.55 टक्क्यांनी वधारला व स्मॉलकॅपमध्ये 0.34 अंकानी घसरण झाल्याचे दिसून आले.

सर्वोच्च कामगिरी

दिग्गज कंपन्यांमध्ये कोटक महिंद्राचा निर्देशांक 4.31 अंकानी तेजीसह मजबूत स्थितीत शुक्रवारी  राहिला. तर पॉवरग्रिड, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचसीएल टेक, एनटीपीसी इन्फोसिस, बजाज फायनान्स, एचडीएफसी, ओएनजीसी, वेदान्ता आणि इंडसइंड बँक यांच्या निर्देशांकात 2.84 अंकानी तेजी नोंदवली. दिवसभरात रुपया 5 पैशांनी तेजीत राहत डॉलरच्या तुलनेत मजबूत स्थितीत राहील्यामूळे डॉलरची किंमत 69.09 वर स्थिरावली.

हिंदुस्थान युनिलिव्हर, येस बँक, आयटीसी, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज सन फार्मा आणि ऍक्सिस बँक यांच्या निर्देशांकात 2.16 टक्क्यांनी घसरण झाली.

आगामी काळात देशातील राजकीय वातावणाचा प्रभाव भारती शेअर बाजारात राहणार असल्याचे तज्ञांकडून यावेळी नोंदवण्यात येत आहे.