|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उत्तर कर्नाटकातील शेतकऱयांचा पुन्हा म्हादाईसाठी अट्टाहास

उत्तर कर्नाटकातील शेतकऱयांचा पुन्हा म्हादाईसाठी अट्टाहास 

प्रतिनिधी/ बेळगाव

उत्तर कर्नाटकातील शेतकऱयांनी पुन्हा म्हादाईसाठी अट्टाहास सुरू केला आहे. उत्तर कर्नाटकातील 13 जिह्यातील शेतकरी बेळगावात दाखल झाले होते. त्यांनी सरकार विरोधात आपले विचार व्यक्त केले. प्रत्येक सरकारने उत्तर कर्नाटकाकडे दुर्लक्ष केले असून म्हादाईचा प्रश्नदेखील निकालात काढला नाही. याचबरोबर शेतकऱयांची ऊसबिले दिली जात नाहीत. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे.

कन्नड साहित्य भवन येथे शेतकरी उपस्थित होते. त्यांनी बैठक घेऊन सरकार विरोधात आरोप केले आहेत. या बैठकीला स्थानिक शेतकरी मात्र उपस्थित नव्हते.

साखर कारखाने अधिक तर आमदार व खासदारांचेच आहेत. त्यामुळे ऊस बिलाचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. भाजप, काँग्रेस किंवा निजद असू दे, सर्वच जण शेतकऱयांवर अन्याय करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. आता स्थानिक शेतकरी संघटनांनी साखर कारखान्यांच्या साखर गोडाऊननाच टाळे ठोकणे गरजेचे असल्याचे मत यावेळी शेतकऱयांनी व्यक्त केले आहे.

यावेळी जयाप्पा कदेगौडा, निंगम्मा माळी, चुनाप्पा पुजेरी, सिद्धू तेजी, सिद्धगौडा मोदगी, जयश्री गुरण्णावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related posts: