|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्य निधी सुपूर्द

सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्य निधी सुपूर्द 

बेळगाव / प्रतिनिधी

धर्मवीर संभाजी राजे बलिदान मासाचे औचित्य साधून समर्थनगर येथील नागेश जोतिबा गावडे यांनी सुवर्ण सिंहासनासाठी 5111 रुपये तर ब्रम्हलिंग मंदिर येथील बालचमुनी किल्ला स्पर्धेत मिळविलेले 1001 रुपयांचे पारितोषिक कर्तव्य निधी म्हणून दिले आहे. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्याकडे हा धनादेश सोपविण्यात आला आहे.

शिवप्रति÷ान हिंदुस्तानच्या माध्यमातून व भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन उभारले जाणार आहे. यासाठी शिवप्रेमींकडून कर्तव्य निधी जमा करण्यात येत आहे. समर्थनगर येथे बलिदान मास आचरण्यात येत आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा कर्तव्य निधी शिवप्रति÷ानच्या कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आला.

यावेळी शहर प्रमुख अजित जाधव, तालुका प्रमुख परशराम कोकीतकर, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, संतोष कणेरी, गिरीष कणेरी, अरुण गावडे, उमेश ताशिलदार, अशोक खवरे, विनायक कणेरी, महादेव आनंदाचे, निर्मल कणेरी, सुनील सुभेदार, महेश चौगुले, सचिन निट्टूरकर, अभिषेक उचगावकर, विनायक इंचल, किरण लंगरकांडे, अक्षय कोडगे, प्रियंका बेकवाडकर, दुर्वा कणेरी, ऋतु माळकी, श्रृष्टी शेडशाळे, गुडी गावडे, संजना पाटील आदी नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.