|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कृष्णा नदीचे पात्र कोरडे

कृष्णा नदीचे पात्र कोरडे 

वार्ताहर/   शिरगुप्पी

शिरगुप्पीसह परिसराला वरदान ठरलेल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चार दिवसापासून कमालीची घट होऊन पात्र कोरडे पडू लागले आहे. यामुळे शेतकऱयांसह नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे. जुगुळ, शहापूर, शिरगुप्पी येथील पिके पाण्याअभावी धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन राजापूर बंधाऱयातून पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

गेल्या महिन्यापासून मंगावती-राजापूर दरम्यान असलेल्या बंधाऱयातून कर्नाटकाकडे येणारे पाणी बांध टाकून पूर्णता थांबविण्यात आले आहे. येथील बंधाऱयाची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. यामुळे बंद झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे बंधाऱयाच्या पूर्वेस असलेल्या जुगूळ, शहापूर, येथील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडू लागले आहे. वाढत्या उन्हामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू झाली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्याने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय पातळीवरील अधिकाऱयांद्वारे कोयना धरणातून राजापूर बंधाऱयाद्वारे पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.