|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती- नितीन गडकरी

राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती- नितीन गडकरी 

ऑनलाईन टीम / नागपूर :

 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. राज ठाकरेंचे विचार सुस्पष्ट होते. मी मैत्री केलेल्यांचा हात कधी सोडत नाही. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. निवडणुकीत काय बोलाव ते त्यांनी ठरवावे. भाजपा आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वाच्या आधारावर आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळपास समान आहे. परंतु काँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी आहे. राज आणि राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये ताळमेळ नाही. विचारांच्या आधारावर युती करावी, राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती, असे  नितीन गडकरी म्हणाले. जे जगात नाही ते नागपुरात करण्याचा प्रयत्न आहे. नागपूरच्या जनतेने सेवेची संधी दिली, आजपर्यंत नागपूरचा विकास, भविष्यासाठी काम केले. आजपर्यंत नागपूरचा विकास, भविष्यासाठी काम केले. नागपूर मेट्रोसारखी जगात कुठेही नाही. बाळासाहेबांचे पुत्र, शिवपक्षप्रमुख म्हणून माझे  उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंबींयावर प्रेम आहे, असेही गडकरी म्हणाले आहेत. मी जात, पंथ, भाषा आणि पक्ष पाहून काम केलं नाही आणि करणारही नाही. गरिबाच्या विकासासाठी राजकारण करेन. अरविंद केजरीवाल माझे चांगले मित्र आहेत. जिंकण्याची साशंकता असल्याने शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी. देवेंद्र फडणवीस राज्य उत्तम चालवत आहेत. विचारांची लढाई असली पाहिजे, राहुल गांधींनी टीका करताना पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असा सल्लाही गडकरींनी राहुल गांधींना दिला आहे.