|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होणार, मोदींच्या जागेच्या घोषणेची शक्यता

भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होणार, मोदींच्या जागेच्या घोषणेची शक्यता 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

 काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर सत्ताधारी भाजप आज पहिली यादी जाहीर करणार आहे. भाजपच्या संसदीय समितीची बैठक आज दुपारी चार वाजता पक्षाच्या मुख्यालयात होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या  माहितीनुसार या बैठकीनंतर पहिल्या यादीतील 100 उमेदवारांची घोषणा होईल.

पहिल्या यादीत पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याचे  म्हटले  जात आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटकसह उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असल्याची औपचारिक घोषणाही आज होऊ शकते. 2014 मध्ये मोदींनी वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील 91 जागांवर मतदान होणार आहे.