|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » शाळेची दुमजली इमारत कोसळली ; प्रार्थनेमुळे शाळकरी मुले बचावली

शाळेची दुमजली इमारत कोसळली ; प्रार्थनेमुळे शाळकरी मुले बचावली 

ऑनलाईन टीम / मंगळवेढा :

मंगळवेढा नगरपालिका कन्या शाळा नंबर 1 या शाळेची दुमजली इमारत कोसळली सुदैवाने या शाळेतील 12 मुली प्रार्थनेसाठी शाळेच्या बाहेर असल्याने 12 जणांचे जीव बचावले, दरम्यान 13 मार्च 1896 मध्ये उभारलेली ही ब्रिटीशकालीन शाळा धोकादायक असून येथे विद्यार्थी बसवू नये असे मुख्याधिकारी यांनी सक्त आदेश दिले असताना शाळा येथे भरविली जात होती त्यामुळे मृत्यूच्या दाढेत विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱया संबंधित अधिकाऱयावर कारवाई करावी अशी मागणी पालकांतून होत आहे.

 

मंगळवेढा शहरात बँक ऑफ इंडियाच्या समोर असणाऱया नगरपालिका कन्या शाळा नंबर 1 मध्ये पहिली ते चौथी पर्यत 23 विद्यार्थी शिक्षण घेतात. येथील प्रशाला कायम 11 ते 5 या वेळेत असते, मात्र उन्हाळी दिवसाने सध्या सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत भरते. शनिवारी सकाळी प्रार्थनेसाठी मुले शाळेच्या बाहेर आली होती हा प्रकार बरोबर 7.15 वाजता घडला जुन्या इमारतीची मोठी पाच ते सहा खांडे पडल्याने मोठा आवाज झाला. मोठय़ आवाजाने शेजारील अनेक नागरिक जमा झाले. चिमुकली ही आवाजाने भेदरली. चार खोल्या असणाऱया या प्रशालेची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी 10 ऑगस्ट 2018 रोजी प्रशासनाधिकारी अनंतकवलस यांना ही इमारत धोकादायक असून येथे शाळा भरवू नये याऐवजी नगरपालिका शेजारी असणाऱया प्रशालेत सर्व विद्यार्थी स्थलांतरित करावेत असे लेखी पत्राद्वारे सूचित केले होते. त्याचबरोबर येथील मुख्याध्यापक क्षीरसागर यांनीही 1 एप्रिल 2018 व 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रशासनाधिकारी यांनी लेखी पत्र देऊन शाळेची दुरावस्था झाल्याबद्दल संगीतले होते, मात्र याबाबत प्रशासनाधिकारी यांनी या पत्राची दखल न घेतल्याने अद्याप ही शाळा या धोकादायक इमारतीत भरत होती मृत्यूच्या दाढेत विद्यार्थी शिक्षण घेत होते आज दुर्दैवाने एकाद्या चिमुकल्या ची जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालक विचारात आहेत