|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, मिथुनेत राहू, धनुत केतू वृषभेत मंगळ आहे. मिथुन राशीत राहू उच्चीचा व धनुत केतू उच्चीचा असतो. उद्योग धंद्यात तुम्हाला नवीन संधी मिळेल. चर्चा चांगली होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रपणे वागा. लोकांना एकत्र करा. मैत्रीतून संबंध वाढवा. योजना मार्गी लावा. नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. कोर्टकेसमध्ये योग्य बोला. परीक्षेसाठी चांगली तयारी करा. वाहन जपून चालवा.


वृषभ

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ येत आहे. याच सप्ताहात धंद्यात वाढ करा. थकबाकी वसूल करा. शनिवारी वाहन जपून चालवा. दुखापत होईल. राजकीय, सामाजिक कार्यात निर्णय घेता येईल. लोकांच्यासाठी केलेले कार्यच पुढील काळात उपयोगी येईल. नोकरीत जम बसवा. टिकून रहा. कला, क्रीडा परीक्षेत यश मिळेल. अभ्यासात सातत्य ठेवा. घरात आनंदी रहाल.


मिथुन

कुंभ राशीत शुक्र प्रवेश. तुमच्याच राशीत राहू, धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ येत आहे. तुमच्या धंद्यातील तणाव कमी होईल. मोठे काम मिळेल. नोकरीत बढतीची शक्मयता दिसेल. राजकीय- सामाजिक कार्यास तुम्हाला मिळालेले पद टिकवा. चांगले कार्य करा. वरि÷ांना खूष करा. घरातील तणाव होळीनंतर कमी होईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परदेशात जाण्याचा योग येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. तरच चांगले यश मिळेल. घर, जमीन, खरेदीचा विचार कराल.


कर्क

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू येत आहे. मुलांच्या समस्या तुम्हाला सोडवाव्या लागतील. तुमच्या विचारांमध्ये मतभेद होईल. धंद्यात समस्या येईल. कामगारांचा त्रास जाणवेल. एखाद्या मोहाला बळी पडू नका. राजकीय, सामाजिक कार्यास लोकांना दिलेले काम पूर्ण कराल. त्यांच्यासाठी काम करा. घरातील वाटाघाटीत वाद होऊ शकतो. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मन स्थिर ठेवा. प्रश्न सुटेल.


सिंह

पुंभ राशीत शुक्र प्रवेश, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ येत आहे. गुप्त कारवायांचा सामना करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांचा निर्णय मानावा लागेल. वाद होईल. रविवार, सोमवार अडचणी येतील. दौऱयात सावध रहा. उद्योग धंद्यात सप्ताहाच्या शेवटी मोठे काम मिळेल. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कायदा पाळा. कला,क्रीडा क्षेत्रात ओळखीने काम मिळेल. वडील माणसांचा अवमान होऊ देऊ नका.


कन्या

कुंभ राशीत शुक्र, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ येत आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी रागावर ताबा ठेवा. ताणतणाव होईल. व्यसनाने त्रास वाढेल. प्रवासात सावध रहा. धंद्यात समस्या वाढतील. नोकर, माणसे कमी होतील. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा टिकवता येईल. कोणत्याही ठिकाणी कायदा मोडू नका. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमात फसगत होईल. विद्यार्थ्यांनी पोटाची काळजी घ्यावी.


तुला

कुंभेत शुक्र प्रवेश, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ येत आहे. धुलीवंदनाच्या दिवशी कोणताही अतिरेक करू नका. दादागिरीने समस्या वाढेल. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करता येईल. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांच्या संबंधी विचार कराल. राजकीय, सामाजिक कार्यास तुम्हाला तडजोड करावी लागेल. नम्रता ठेवावी लागेल. कला- क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढवता येतील. विद्यार्थ्यांनी मन स्थिर ठेवावे. वस्तू सांभाळावी.


वृश्चिक

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ येत आहे. घरातील कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. कामगारांना सांभाळून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक चकीत होतील. तुमच्या योजना गतीमान करता येईल. नोकरीत वरि÷ांची मर्जी राहील. आर्थिक व्यवहारात दक्ष रहा. कला- क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. परीक्षेत यश मिळेल, आळस करू नका. शेतकरी वर्गाला नवी दिशा मिळेल.


धनु

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ येत आहे. साडेसाती सुरू आहे. रविवार, सोमवार धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. धंदा कसा वाढवायचा त्याकडे लक्ष पुरवा. भिडस्तपणा न ठेवता प्रयत्न करा. मोठय़ा लोकांची मदत घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीची मोठी संधी मिळेल. लोकांचा विश्वास मिळवता येईल. नोकरीत बढती मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. विद्यार्थी वर्गासाठी यश सोपे नाही. प्रयत्न करा. यश मिळेलच.


मकर

साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. कुंभेत शुक्र प्रवेश, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू येत आहे. चौफेर सावध रहा. उद्योगधंद्यात नवीन संधी मिळेल. नोकरीत चांगला बदल करू शकाल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. मेहनत करा. लोकांना दिलेला शब्द पूर्ण करा. घर, जमीन, यासंबंधी समस्या सोडवा. कोर्टकेस मिटवा. विद्यार्थी वर्गाने हुशारी अभ्यासात वापरावी, सरळमार्गी जावे.


कुंभ

तुमच्याच राशीत  शुक्र प्रवेश, मिथुनेत राहू,धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ येत आहे. तुम्ही वेळेला महत्त्व द्या. तुमच्या कामात यश मिळेल.  या सप्ताहात काही अडचणी येतील. कायदा पाळा. धंद्यात वाढ करण्याचा विचार कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा चांगले कार्य करा. कोर्टकेस सोपी नाही. प्रति÷ा राहील. यश खेचता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात काटे की टक्कर द्या.


मीन

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू, वृषभेत मंगळ, येत आहे. नोकरी- धंद्यात कोणतेही काम कायद्याच्या  कक्षेत राहून करा. जवळचे लोक अडचणी आणू शकतात. वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध रहा. आर्थिक व्यवहारात फसगत टाळता येईल.  कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. प्रेमात फसगत होईल. विद्यार्थी वर्गाने खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. होळीच्या दिवशी व्यसन करू नका.