|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » ‘आघाडी करताना तंगडय़ात तंगडे घातले’,उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा

‘आघाडी करताना तंगडय़ात तंगडे घातले’,उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीचे गुणगान गाताना आघाडीवर जबरी टीका केली आहे. ‘आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडे घातले आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर सडकून टीका केली. तसेच ‘आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणे आणि जनतेला त्याचा सुगंध देणे ही आपली जबाबदारी आहे, असेही उद्धव यांनी म्हटले.

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ‘आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडे घातले आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीचा पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणे आणि जनतेला त्याचा सुगंध देणे ही आपली जबाबदारी आहे. ‘शिवसेनाप्रमुखांनी नेहमी मला गोरगरीबांच्या मुलांची पहिली काळजी घ्यायला, त्यांचे लाड करायला पहिले शिकवले आहे. त्यामुळे माझा, ‘भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये, असा म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला आहे.

Related posts: