|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली 

ऑनलाईन टीम / गोवा :

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावली आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले.

मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी आहे. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सजिन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण सध्या स्थिती चिंताजनक आहे.