|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » करुळ घाटात कार झाडाला धडकली

करुळ घाटात कार झाडाला धडकली 

वार्ताहर / वैभववाडी:

करुळ घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्यानजीकच्या सुरूच्या झाडाला धडकली. हा अपघात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. वाहन क्रमांकावरून ही कार सिंधुदुर्गातील असल्याचे स्पष्ट होत असून कारमधील प्रवाशांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, कारच्या धडकेने सुरुचे झाड मुख्य वीज वाहिन्यांवर कलंडल्याने गावातील वीज पुरवठा तब्बल पाच तास खंडित झाला होता. अपघाताची नोंद उशिरापर्यंत पोलीस स्थानकात नव्हती.

Related posts: