|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पालकमंत्र्यांनी घेतली संजू परब यांची भेट

पालकमंत्र्यांनी घेतली संजू परब यांची भेट 

प्रतिनिधी / सावंतवाडी:

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी रात्री महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली. केसरकर यांनी परब यांच्या इनोव्हा कार जळीत प्रकरणाची माहिती घेतली. कार जाळणाऱया आरोपींचा छडा लावू, अशी ग्वाही केसरकर यांनी परब यांना दिली.

परब यांची कार अलिकडेच अज्ञाताने जाळली होती. या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपही झाले होते. माजी खासदार नीलेश राणे व स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी दीपक केसरकर यांना टार्गेट केले होते. मात्र, स्वाभिमानचे अध्यक्ष नारायण राणे यांनी याप्रकरणी यू-टर्न घेत आरोपींना पकडल्याशिवाय याप्रकरणी भाष्य करणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी आपला सिंधुदुर्ग पोलिसांवर विश्वास असल्याचेही स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी परब यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मायकल डिसोझा, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, स्वाभिमानचे युवक तालुकाध्यक्ष विनायक ठाकुर उपस्थित होते.