|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हातकणंगलेच्या इस्लामपूर मतदार संघात 292 मतदान केंद्र

हातकणंगलेच्या इस्लामपूर मतदार संघात 292 मतदान केंद्र 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इस्लामपूर विधानसभा मतदार संघात    292 मतदान केंद आहेत. त्यासाठी 1605 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आली आहेत. क्षेत्रामध्ये निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवेल. निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱयांविरुध्द कारवाई केली जाईल, असा इशारा प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.

   ते पुढे म्हणाले, या निवडणूकीसाठी इस्लामपूर मतदार संघामध्ये 1 लाख 37 हजार 73 पुरुष आणि 1 लाख 31 हजार 13 स्त्राr मतदार असे एकूण 2 लाख 68 हजार 86 इतके मतदार आहेत. सैनिक मतदारांमध्ये पुरुष 506 आणि स्त्राr सैनिक 1 अशा एकूण 507 जणांचा समावेश आहे. तर अंध 389, मुकबधिर  444, अस्थिव्यंग 1117 इतर अपंग 238 असे एकूण 2 हजार 188 मतदार आहेत. मतदाना†िदवशी दिव्यांग मतदारांना आयोगाच्या ऍपवरुन मागणी केल्यास त्यांना मतदानासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था केली जाणार आहे. मतदान केंद्रावर अंधासाठी ब्रेल लिपी, मुकबधिरांसाठी त्यांच्या संकेतीक भाषा महिती देणारी व्यक्ती असणार आहे.

   पाटील पुढे म्हणाले, ईव्हीएम यंत्र आणि व्हीव्ही पॅट यंत्रावरील मतदानाचे प्रात्यक्षिक माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने शासकीय आणि खासगी मालमत्तांच्या कक्षेतील विविध राजकीय पक्षांचे झेंडे, पोस्टर्स, बॅनर, भित्ती पत्रके, कोनशिला, डिजिटल बोर्ड, भिंतीवर रंगवलेल्या जाहिराती असे, एकूण 1500 फलक काढून टाकण्याची कारवाई केली आहे.

   मतदान प्रक्रियेवेळी एखाद्या मतदाराने इव्हीएम यंत्रामधील मतदानाबाबत तक्रार केल्यास त्याला पुन्हा मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे. दुसऱयावेळी मतदान करताना त्याला शासकीय अधिकाऱयांसमोर मतदान करावे लागणार आहे. यामध्ये त्याने केलेले मतदान आणि व्ही.व्ही पॅटयंत्रावर मतदान महितीची शक्यता पडताळली जाईल. त्यानंतर अशा कांगावखोर मतदारांविरुध्द त्याच ठिकाणी आयोगाच्या नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार असल्याचे प्रांताधकारी पाटील यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार रविंद्र सबनिस, नायब तहसीलदार सरस्वती पाटील, उदय पवार उपस्थित होते.