|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिक्षकांच्या बदल्यांबाबत अजूनही संभ्रम कायम

शिक्षकांच्या बदल्यांबाबत अजूनही संभ्रम कायम 

प्रतिनिधी/ सातारा

जादा त्रास नोकरी करताना नको, अशी नोकरदारांचीही अपेक्षा अलिकडे बनू लागली आहे. त्यामध्ये जिह्यात शासकीय विशेष करुन शिक्षकांच्याबाबतीत ही अवस्था आहे. आपली शाळा ही गावची, गावालगतच किंवा शहरातली असावी असा अट्टहास अलिकडे शिक्षकांचा बनू लागला आहे. मात्र, ग्रामीण भागातल्या ओस पडत असलेल्या शाळेवर काम करण्यास त्यांचा नकार असतो. यावषीं बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली असून संवर्ग 1, 2 मधूनच आपल्याला बदलीचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी खटापटी सखाराम मास्तरांच्या सुरु झाल्या आहेत. मात्र, अजून नेमक्या कुठे, किती जागा शिल्लक आहेत हे समजत नसल्याने संभ्रम आहे. रविवारीही सुट्टीच्या दिवशी शिक्षण विभागात माहिती भरण्याचे कामकाज सुरु होते.

शासनाची नोकरी म्हणजे सर्वसामान्य लोकांची सेवा करणे अशी व्याख्या असते. परंतु अलिकडे शासकीय नोकरी म्हणजेच स्वतःचे भवितव्य, अशीच व्याख्या बनवली आहे. त्यामध्ये शिक्षकवर्ग हा प्रामुख्याने येतो. देशाची पिढी घडवणारा हा वर्ग मात्र, या वर्गाकडून ग्रामीण भागात काम नकोच, असा हिय्या अलिकडे पुरवला जात आहे, मिळावी शाळा ती शहरालगतची. जेथे कोणताही त्रास नको. फक्त आपलाच दरारा असला पाहिजे, अशी पद्धत होवू लागली आहे. त्यामुळे अगोदरच ग्रामीण भागातील रोडावत चाललेल्या शाळा. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येअभावी बंद पडू लागल्या आहेत. त्या शाळेचा पट सुधारावा, शाळा दर्जेदार कराव्यात याकडे दुर्लक्ष होते. परंतु आमची बदली ही चांगल्याच ठिकाणी झाली पाहिजे. 2017 पूर्वी जे नियम होते. त्यामध्ये शिक्षकांच्या पुढाऱयांचाच लाभ व्हायचा. ते नेते शाळा सोडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शिक्षण विभागात तसेच नेत्यांच्या कार्यक्रमात लुडबुड करताना दिसत होते. त्यांच्याच हाती राजकारण हे समीकरण बनले होते. अशा नेतेगिरी करणाऱया शिक्षकांना लगाम बसावा म्हणून 27 फेब्रुवारी 2017 चा अध्यादेश निघाला. त्यानुसार सुगम आणि दुर्गम हा निकष चांगल्या हेतूने निघाला. त्यानुसार शिक्षक पुढारी सुटले. गतवर्षी बदलीची प्रक्रिया झाली. त्यानंतर यावर्षी बदलीची प्रक्रिया सुरु झाली आहे. माहिती मागवण्याचे काम सुरु झाल्याने रविवारीही जिह्यातील 11 तालुक्यातील शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग बदलीप्राप्त शिक्षकांची माहिती गोळा करण्यात दंग होता. माहिती घेण्याचे काम बऱयापैकी पूर्णत्वाकडे आले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. परंतु बदली आपली होईल, या आशेवर असणाऱया शिक्षकांच्या नजरा या प्रक्रियेकडे लागून राहिल्या आहेत. संवर्ग 1 मधून गतवर्षी बदल्या झाल्या आहेत. तरीही वयाच्या अटीतून यावर्षी पुन्हा बदलीप्राप्त बनतोय की काय?, तसेच पतीपत्नी एकत्रिकरणातून गतवर्षी बदली झालेली असली तरीही त्यातील एकाची पुन्हा यावर्षी बदली होते की काय?, अलर्ट नाही राहिले तरीही खो बसून चुकीच्या ठिकाणी बदली व्हायची, असे संभ्रम होवू लागले आहेत. शिक्षण विभागाकडून अद्यापही या प्रक्रियेबाबत काहीच बोलले जात नसल्याने शिक्षकांच्यामध्ये थोडीशी उत्सुकता तर थोडासा तणाव दिसत आहे. दरम्यान, नवीन जीआर काय आहे,त्यामध्ये आपला समावेश नाही ना याचीही चाचपणी शिक्षक करताना दिसत आहेत….

 

Related posts: