|Thursday, June 27, 2019
You are here: Home » leadingnews » पंतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण

पंतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण 

ऑनलाईन टीम /  गोवा :

  गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिकृतपणे रात्री 8.00 वाजता ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केले.

मनोहर पर्रीकर अंत्ययात्रा कार्यक्रम – १८ मार्च २०१९

* स. ९.३० ते १०.३० – 
पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप प्रदेश कार्यालयात 

 * स. १०.३० – कला अकादमी, पणजी

* स. ११ ते ४ : जनतेसाठी अंत्यदर्शन 

* दु. ४ वाजता : SAG मैदान कंपाल इथपर्यंत अंत्ययात्रा येणार 

* दू. ४.३० वाजता : SAG मैदान इथेच  अंत्यविधी 

* संध्या. ५ वाजता : अंत्यसंस्कार

पर्रीकर यांच्या निधनानंतर देशात दुखवटासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.