|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » पश्चिम महाराष्ट्रातील अस्तित्वाची कॉँग्रेसला चिंता; दोनच जागा निश्चित

पश्चिम महाराष्ट्रातील अस्तित्वाची कॉँग्रेसला चिंता; दोनच जागा निश्चित 

ऑनलाईन टीम /  सांगली :

 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असताना, सांगलीच्या जागेवरून कॉँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. पश्चिम महारष्ट्रात  काँग्रेसला केवळ तीनच जागा वाट्याला आल्या असताना, सांगलीचीही जागा गेली तर पश्चिम महाराष्टÑातील पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भीती सांगली कॉँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे व्यक्त केली आहे.
सांगली जिल्हा कॉँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या या पत्रावर आमदार विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मित्रपक्ष असलेल्या राष्टवादीच्या वाट्याला पश्चिम महारष्ट्रातील एकूण सात जागा आल्या आहेत. कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या तीनपैकी पुणे व सोलापूरची जागा निश्चित आहे. हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे. आता सांगलीच्या जागेसाठी कॉँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दावेदारी सुरू झाली आहे. ही जागा कॉँग्रेसकडून गेल्यास पश्चिम महारष्ट्रातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सांगलीऐवजी महारष्ट्रातील अन्य ठिकाणच्या जागेची तडजोड करून जागावाटपाचा तिढा सोडवावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.
सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर दादा व कदम घराण्यातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. आता ही जागा कोणाला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.