|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » वरळीजवळ समुद्रात बोट बुडाली, एक जण बेपत्ता

वरळीजवळ समुद्रात बोट बुडाली, एक जण बेपत्ता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील वरळीजवळील समुद्रात सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बोट बुडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य हाती घेऊन बुडालेल्या बोटीतील सहा प्रवाशांना वाचवले. एक प्रवासी बेपत्ता असून, हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीनं त्याचा शोध घेण्यात येत आहे.

   वरळीजवळच्या समुद्रात सकाळी अकराच्या सुमारास टग रेवती नावाची बोट बुडाली. यासंदर्भात माहिती मिळताच, तटरक्षक दलाने अमर्त्या बोटीच्या मदतीने बुडालेल्या बोटीतील प्रवाशांना वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर सहा जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले. सर्व जण सुरक्षित असून, त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. या दुर्घटनेत एक प्रवासी बेपत्ता झाला आहे. तटरक्षक दलाच्या दोन बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे.