|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » जिओ गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लवकरच

जिओ गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लवकरच 

29 शहरात प्रथम उपलब्ध : डेन नेटवर्क्स, हॅथवे केबलसह डेटाकॉम सोबत भागिदारी

वृत्तसंस्था/ मुंबई

आपल्याला आता लवकरच आत्तापर्यंतचे सर्वात स्वस्त ब्रॉडबँड सेवेचे प्लॅन मिळणार आहेत. जिओ गिगाफायबर लवकरच रोलआउट केला जाऊ शकतो. रिलायन्स जिओने यासाठी अगोदरच घोषणा केली आहे. ब्रॉडबँड सेवेत चांगल्या जोडणीसाठी जिओने डेन नेटवर्क्स, हॅथवे केबल आणि डेटाकॉम बरोबर भागिदारी केली आहे.

रिलायन्स जिओने डेन नेटवर्कचा इतर भागही विकत घेतला आहे, ज्यामुळे कंपनीवर अधिक नियंत्रण करता येईल असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. रिलायन्स जिओजवळ आधीच डीएन नेटवर्कमध्ये 66.57 टक्के भागीदारी आहे. आता कंपनीने 5.17 कोटी अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. यासह, मल्टी सिस्टम ऑपरेटर (एमएसओ) डेन नेटवर्कचा त्याचा वाटा 78.62 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हॅथवेमध्ये जिओचा 51.3 टक्के शेअर्स आहे. या दोन्ही कंपन्या भारतातील सर्वात मोठय़ा लोकल केबल ऑपरेटर (एलसीओ) आहेत.

जिओ गिगाफायबर च्या आगमनानंतर लोकल केबल ऑपरेटर्सनाही स्पर्धा मिळणार आहे, कारण ते एफटीटीएचसमोर उभे राहण्यास सक्षम नसेल. परंतु, नवीन भागीदारी पाहिल्यास जिओ फायबर ब्रॉडबँड सेवेत मोठा बदल आणण्याची शक्यत वर्तविली जात आहे.

भारतातील 29 शहरात सेवा सुरू होईल

जिओ गिगाफायबर बेंगळूर, चेन्नई, पुणे, लखनऊ, कानपूर, रायपूर, नागपूर, इंदौर, ठाणे, भोपाळ, गाजियाबाद, लुधियाना, कोयंबटूर, आगरा, मदुरई, नाशिक, फरीदाबाद, मेरठ, राजकोट, श्रीनगर, अमृतसर, पटना, इलाहाबाद, रांची, जोधपूर, कोटा, गुवाहाटी, चंदीगड आणि सोलापूर या शहरांत पहिल्यांदा सेवा सुरू करणार आहे, असे ऑनलाइन अहवालातून सांगण्यात आले आहे.