|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हापूस आंब्याचे उत्पादन उच्च प्रतीचे घ्या!

हापूस आंब्याचे उत्पादन उच्च प्रतीचे घ्या! 

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

कोकणातील हापूस आंबा हा अतिशय दर्जेदार आहे. देश, विदेशात हापूस आंब्याला मागणी आहे. त्यासाठी आंबा बागायतदारांनी संशोधनाचा वापर करून उच्च प्रतीचे आंबा उत्पादन घ्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कोकण विभागाचे अध्यक्ष श्रीकृष्ण परब यांनी केले.

प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रीकल्चर संस्थेतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी परब बोलत होते. माजी सहयोगी संचालक प्रा. जे. एल. पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास सावंत, विनायक काशिद, डॉ. एस. डी. परब, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रीकल्चरचे राज्य समन्ववयक मिलिंद प्रभू, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शासत्रज्ञ डॉ. बी. एन. सावंत, डॉ. मोहन दळवी, डॉ. पुष्पा पाटील, डॉ. स्मिता देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. बी. एन. सावंत यांनी आंबा बागांमध्ये कृषी पर्यटन, डॉ. मोहन दळवी यांनी आंब्यावरील रोग व किडी, डॉ. काशिद यांनी आंब्याचे उत्पादन व घ्यायची काळजी, डॉ. जे. एल. पाटील यांनी मसाला पिकांची लागवड, डॉ. विलास सावंत यांनी आंबा उत्पादनात घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी भूषण नाबर, शिवराम आरोलकर, सदाशिव आळवे आदींनी शंका उपस्थित केल्या. त्याचे निरसन करण्यात आले. आभार राज्य समन्वयक मिलिंद प्रभू यांनी मानले.