|Saturday, January 25, 2020
You are here: Home » उद्योग » ओलामध्ये हय़ुंडाई-किया मोटर्स 2055 कोटी रुपये गुंतवणार

ओलामध्ये हय़ुंडाई-किया मोटर्स 2055 कोटी रुपये गुंतवणार 

सर्वात मोठी संयुक्त गुंतवणूक होण्याचा अंदाज

वृत्तसंस्था/ बेंगळूर

दक्षिण कोरियाची कार निर्मिती करणारी हय़ुंडाई मोटार आणि किया मोटर्स राइड शेअरिग कंपनी लवकरच ओला कंपनीमध्ये 30 हजार कोटी डॉलर(2055 कोटी रुपये) यांची गुंतवणूक करणार आहे. तर या  दोन्ही कंपन्यांची सर्वात मोठी ही एकत्रित गुंतवणूक ठरणार आहे.

भारतातील परिवहनाचा विचार करता सध्या या तिन्ही कंपन्या मिळून विशेष वाहन, इलेक्ट्रीक वाहन यांना आवश्यक असणारी पायाभूत सुविधा उपलब्ध करणार आहेत. तर यांच्या आधारेच ओला कंपनीकडे असणाऱया चालकांसाठी अनेक अत्याधुनिक सुविधांचा पुरवठा करणार असल्याचेही यावेळी कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

शेअरिंगवर आधारीतच वाहने

तिन्ही कंपन्या एकत्रितपणे भविष्यात शेअरिग मार्पेटवर आधारीत वाहनांची उपलब्धी करणार असुन या सेवेचा वाढत्या ग्राहकांच्या मागणीवर यातून कंपनीला नफा कमाई होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

ग्लोबल मार्केटचे नेतृत्व

आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारात टिकाव लागण्यासाठी तयार करण्यात येणाऱया नियमावलीची पायाभरणी ही मुख्य भारतीय बाजारात होणार आहे. व यातून भविष्यात कंपनी एका सर्वोच्च स्थानी झेप घेणार असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष यूसन चुंग यांनी म्हटले आहे.

Related posts: