|Friday, February 28, 2020
You are here: Home » उद्योग » हुवाईकडून एप्रिलमध्ये स्मार्ट टीव्हीचे सादरीकरण?

हुवाईकडून एप्रिलमध्ये स्मार्ट टीव्हीचे सादरीकरण? 

दोन कॅमेऱयांसह पाच सपोर्टची सुविधा मिळणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सध्या जगभरातील बाजारात अनेक कंपन्या आपल्या व्यवसायाचे स्वरुप दिवसेंदिवस ग्राहकांच्या मागणीप्रमाणे बदलत असल्याचे पहावयास मिळत आहे जसे भारतात जिओ नेटवर्कची उभारणी व विस्तार, ऑनलाईन बाजारातील ऍमेझॉनची डिजिटल जाहिरातीकडे होत असणारी वाटचाल व सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आदी टप्प्यावर बदल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर अशीच आणखीन एक क्रांती म्हणजे चीनी स्मार्टफोन कंपनी हुवाई स्मार्ट टीव्हीचे सादरीकरण एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

सध्या हुवाईसोबत शाओमीसारख्या अनेक कंपन्या स्पर्धेत आहेत. परंतु त्यांना टक्कर देण्यासाठी कंपनी आपल्या उत्पादनात अत्याधुनिक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. हुवाईच्या स्मार्टटीव्हीमध्ये दोन कॅमेऱयासह सोशल मीडीया ऍपसह गेमचे फिचर्स देण्यात येणार असल्याचे यावेळी नोंदवण्यात आले आहे. 

उत्पादन योजना

कंपनीने सदर स्मार्ट टीव्हीचे उत्पादनाचे ध्येय जवळपास 1 कोटी युनिट्स इतकी विक्री होणार अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टीव्ही मॉडेल

टीव्हीच्या उत्पादनात 55 इंच आणि 65 इंच आकारमानाचे दोन टीव्हीचे मॉडेल सादर होणार आहेत. चीनमधील शेनझेन स्टार ऑटोइलेक्टानिक्स लिमिटेड याच्याकडून हे उत्पादन घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

Related posts: