|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बसपच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बसपच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

लखनौमधील महत्वपूर्ण बैठकीनंतर निर्णय : आघाडीच्या संयुक्त रॅलीने प्रचाराचा शुभारंभ

नवी दिल्ली

 लोकसभेच्या निवडणुकीसाठी बसप अध्यक्षा मायावती यांनी आपल्या पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशच्या 11 लोकसभा जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
यादी जाहीर करण्याच्या अगोदर मायावती यांनी लखनौमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या तिकीटांवर चर्चा झाल्यानंतर यादी जाहीर करण्यात आली.

समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलाच्या उत्तर प्रदेशातील आघाडीनंतर बहुजन समाज पार्टीला 38 जागा मिळाल्या, त्यातील 11 जागांवर मायावती यांनी उमेदवारांची घोषणा केली
आहे.

उत्तर प्रदेशच्या 11 जागावरील उमेदवार हाजी फजर्लुह्मान (सहारनपुर), मकूल नागर (बिजनौर), गिरीशचंद्र जाटव (नगीना), कुंवर दानिश अली (अमरोहा), हाजी मोहम्मद याकूब कुरैशी (मेरठ), सतबीर नागर (गौतम बुद्ध नगर), योगेश वर्मा (बुलंदशहर), अजित बालियान (अलीगड), मनोज सोनी (आग्रा), राजवीर सिंह (फतेहपुर सीकरी) रुची वीरा (आंवला) असे आहेत.  

अखिलेश-मायावती यांची सहारनपूरमध्ये संयुक्त रॅली

उत्तर प्रदेशात सपा-बसपा आणि आरएलडीच्या आघाडीत काँग्रेसला स्थान देण्यात आले नाही. दरम्यान, आघाडीने काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन जागा सोडत त्याठिकाणी उमेदवार दिला नाही. आघाडीत झालेल्या जागा वाटपानुसार बहुजन समाज पार्टी 38, समाजवादी पार्टी 37 आणि राष्ट्रीय लोकदल ला 3 जागा देण्यात आल्या आहेत. मायावती, अखिलेश यादव आणि अजित सिंह सहारपूरच्या देवबंदमध्ये संयुक्त रॅली काढून आपल्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करण्या आहेत.

Related posts: