|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वाभिमानीकडून उमेदवारीसाठी डॉ.जितेश कदम यांना गळ!

स्वाभिमानीकडून उमेदवारीसाठी डॉ.जितेश कदम यांना गळ! 

 

प्रतिनिधी/ सांगली

 सांगली लोकसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांनी प्रचार सुरू केला असला तरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या आघाडीच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम आहे. आघाडीतर्फे संभाव्य उमेदवारांच्या यादीत शुक्रवारी जितेश कदम यांच्या नावाची नव्याने भर पडली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तगडय़ा उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आपल्या समर्थकांची रविवारी सांगलीत समाधीस्थळावर बैठक आयोजित केली आहे.

 आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटयाला गेल्याची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी आ. मोहनराव कदम यांनी सांगलीत काँग्रेसचाच उमेदवार उभा राहील अशी घोषणा केली. मोहनराव कदम काँग्

sस कार्यालयात पत्रकार बैठकीत बोलत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आ.कदम यांच्या भेटीला आले होते. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार आहे. पण माजी केंद्रीय राज्यमंत्री
प्रतीक पाटील, गोपीचंद पडळकर, अजितराव घोरपडे, इंद्रजित देशमुख यांनी उमेदवारीस नकार दिला असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी आ. मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश कदम यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा केली.

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी आघाडीकडे हातकणंगले व बुलढाणा दोन जागा मागितल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीने हातकणंगले दिला. बुलढाणा जागेवर उमेदवार जाहीर केला. त्यानंतर स्वाभिमानीने वर्धा अथवा सांगलीची जागा मागितली. वर्धा जागेवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार अशी आशा त्यांना आहे.  मात्र या ठिकाणी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ताकदवान उमेदवार मिळेना, त्यांनी उमेदवारासाठी शोधाशोध सुरू केली आहे.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सेवानिवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर गळ टाकला होता. मात्र त्यांनी ‘स्वाभिमानी’कडून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यानंतर खा. राजू शेट्टी यांनी प्रतीक पाटील यांच्यावर गळ टाकला होता. मात्र त्यांनी देखील निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांचे नातू व स्व.मदनभाऊ पाटील यांचे जावई डॉ. जितेश कदमांवर उमेदवारीसाठी गळ टाकला आहे.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले, बाजार समितीचे संचालक कुमार पाटील, वैभव पाटील आदींनी आ. मोहनराव कदम यांची कॉंग्रेस कमिटीमध्ये भेट घेतली. सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ला मिळणार या आशेवर त्यांनी जितेश कदमांना उमेदवारी देऊ, त्यासाठी तुम्ही जोर जावावा, अशी मागणी केली. एक तासभर चर्चा करण्यात आली. मात्र आ. मोहनराव कदम यांनी होकार दिला नाही. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  दोन दिवसात तसा निर्णय देखील होईल, असे त्यांनी सांगितले.

 पण या चर्चेनंतर जिल्हय़ात डॉ. जितेश कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 काँग्रेस आघाडीतर्फे इच्छुक असणारे वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी रविवारी सायंकाळी चार वाजता वसंतदादा समाधीस्थळावर काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते अजमावून घेऊन विशाल पाटील आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे

Related posts: