|Monday, June 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशीभविष्य

राशीभविष्य 

रविवार दि. 24 ते शनिवार 30 मार्च 2019

मेष

धनु राशीत गुरु प्रवेश करीत आहे. बुध, नेपच्यून युती होत आहे. सोमवार, मंगळवार धावपळ होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. धंद्यात सुधारणा करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रपणे वागा. तुमचा विचार लोकांना पटेल. नोकरीत वरि÷ांचा मान राखा. घरगुती ताण कमी  करता येईल. कला, क्रीडा, साहित्यात तुम्ही मेहनत घ्या. प्रसिद्धीसाठी घाई करू नका. लोकप्रियता मिळेल. परीक्षेसाठी उत्साह ठेवा. मेहनत घ्या.


वृषभ

धनु राशीत गुरु ग्रहाचे राश्यांतर मोठे आहे. चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. या सप्ताहात मन विचलित होईल. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना सावध रहा. धंद्यात राग ठेवून चालणार नाही. राजकीय-सामाजिक कार्यात धावपळ होईल. वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा कायदा मोडू नका. कोर्टकेसमध्ये अडचण येऊ शकते. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. परीक्षेसाठी जास्त कष्ट घ्या.


मिथुन

सप्ताहाच्या शेवटी धनु राशीत गुरु महाराज प्रवेश करीत आहे. बुध नेपच्यून युती होत आहे. रेंगाळत राहिलेली धंद्यातील, घरातील कामे करून घ्या. सोमवार, मंगळवार रस्त्याने नीट चाला. दुखापत संभवते. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकप्रियता मिळेल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात नवा विचार मिळेल. कोर्टकेसमध्ये  मदत मिळेल. विद्यार्थी वर्गाने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.


कर्क

धनु राशीत गुरु महाराज येत आहेत. सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात खर्च वाढेल. कामगारांच्याकडून मनस्ताप होऊ शकतो. मोठे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. घरगुती वातावरण नरम-गरम राहील. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. जवळचे नेते, सरकारी कट करण्याचा प्रयत्न बुधवार, गुरुवार करतील. कोर्टकेसमध्ये सावध रहा.


सिंह

धनु राशीत गुरु महाराज प्रवेश करीत आहे. बुध, नेपच्यून युती होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. शेअर्समध्ये थोडा लाभ मिळेल. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखा. घरगुती समस्या सोडवण्याचा मार्ग शोधावा लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. मोठेपणा न करता कार्य करा. तुमचे वर्चस्व लोकांनी वाढवावे. यासाठी प्रयत्न करा. त्यांचा गरजा पुरवा, कलाक्रीडा क्षेत्रात जिद्द ठेवा. प्रसिद्धीसाठी थांबावे लागेल.


कन्या

धनु राशीत गुरु महाराज प्रवेश करीत आहे. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. प्रत्येक दिवस प्रगतीचा ठरू शकतो. तुमच्या कामात प्रयत्नांचा जोर वाढवा. धंद्यात तडजोड करावी लागेल. खाण्याचे स्वत:चे  तंत्र सांभाळा. व्यसनाने नुकसान होईल. अनोळखी माणसावर जास्त विश्वास ठेऊ नका. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. वाहन जपून चालवा. कोणताही नियम मोडू नका. चांगली संगत मुलांना ठेवावी.


तुळ

धनु राशीत गुरु महाराज येत आहे. चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. कोणतेही महत्त्वाचे काम जिद्दीने पूर्ण करता येईल. सहनशीलता ठेवा. अहंकाराने  वागल्यास समस्या येईल. धंद्यात वाढ करू शकाल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. वरि÷ांना विरोध करून चालणार नाही. नोकरीत काम वाढले तरी तुम्ही यशस्वी व्हाल. घरातील ताण कमी होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळवणे कठीण आहे. कोर्टकेसमध्ये प्रसंगांचे गांभीर्य ओळखा.


वृश्चिक

धनु राशीत गुरु महाराज येत आहे. सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. रविवारी क्षुल्लक वाद, मतभेद होईल. धंद्यात गोड बोलून कार्यभाग साधावा लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव राहील. जीवनसाथीमुळे यांच्याशी किरकोळ मतभेद होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेस यशस्वी करता येईल. परीक्षेसाठी चांगली तयारी करता येईल. वाहनाचा वेग कमी ठेवा.


धनु

तुमच्याच राशीत गुरु महाराज प्रवेश करीत आहे. बुध, नेपच्यून युती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी चांगली घटना घडेल. सोमवार, मंगळवार तणाव वाढू शकतो. धंद्यात प्रगती करण्याची तयारी करा. दुसऱयावर जास्त अवलंबून  राहू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. लोकांच्या कल्याणासाठी चांगले कार्य करा. तरच तुम्ही टिकून रहाल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. नोकरीचा प्रयत्न करता येईल. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी.


मकर

धनु राशीत गुरु महाराज प्रवेश करीत आहे. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. नव्या विचारांनी पुढे जातांना बुद्धीचा वापर करा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला फारच महत्त्वाचा ठरू शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. बुधवार, गुरुवार एखादी धक्कादायक घटना घडेल. दादागिरीची भाषा वापरण्याची वेळ येऊ शकते. प्रसंगानुरुप  निर्णय घ्यावा लागेल. कला- क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थीवर्गाने भ्रमात राहू नये, प्रयत्न करावेत.


कुंभ

धनु राशीत गुरु महाराज प्रवेश करीत आहे. बुध नेपच्यून युती होत आहे. शनिवार तुमच्या बोलण्यावर हल्लाबोल होण्याचा संभव आहे. धंद्यात प्रगतीची मोठी संधी मिळेल. घरातील समस्या कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात चांगला बदल करता येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. जनतेचे प्रेम मिळेल. कला,क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. नोकरीत चांगला बदल होईल. परीक्षेत उत्तम यश मिळवता येईल.


मीन

धनु राशीत गुरु ग्रहाचे  राश्यांतर तुमच्या फायद्याचेच ठरेल. चंद्र, शनि लाभयोग होत आहे. घरगुती समस्या असल्या तरी मन खंबीर राहील. क्षुल्लक वाद कुठेही वाढवू नका. धंद्यात अडचणीवर मात करावी लागेल. संयम ठेवा. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. वाटाघाटीत तणाव होईल. राजकीय- सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. जवळच्या लोकांना ओळखून ठेवा. वरि÷ मदत करतील. कला- क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मैत्रीत दुरावा संभवतो. जिद्द ठेवा.