|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘मडगाव-हप्पा’ रेल्वेतून दिड लाखाची दारू जप्त

‘मडगाव-हप्पा’ रेल्वेतून दिड लाखाची दारू जप्त 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमधून चोरटय़ा पद्धतीने गुजरातकडे जाणारी गोवा बनावटीची दारू शनिवारी रेल्वे पोलिसांनी जप्त केली.  ‘मडगाव -हप्पा’ या ट्रेनमधून रत्नागिरी रेल्वे स्थानकात सुमारे दिड लाखांची ही दारू रेल्वे ताब्यात घेतली.

मडगाव-हप्पा ट्रेनमधून गोवा बनावटीची दारू गुजरातला नेली जात असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. बोगीच्या बाथरुमच्या बाहेर असणाऱया प्लायमध्ये कुणालाही संशय येणार नाही अशा प्रकारे ही दारु ठेवण्यात आली होती. मात्र रेल्वे पोलीसांनी हा डाव उधळून लावला. रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पोलीसांनी झडती घेतली. त्यावेळी जवळपास दिड लाख रुपये किमतीची ही दारु मिळून आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरुन अनेक वेळा गोवा बनावटीची दारुची तस्करी केली जाते. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महामार्गावर उत्पादन शुल्क विभागाने करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे आत कोकण रेल्वे मार्गाचा वापर दारु तस्करीसाठी करण्यात येत असल्याचे या निमित्ताने समोर आले. गोवा बनावटीची ही दारू गुजरातमध्ये पाठवून पाचपट किमतीला त्याची विक्री होत असल्याचे या  कारवाईच्या चौकशीतून उघड झाले आहे.

 ही कारवाई रेल्वे पोलीस निरिक्षक अजित मधाळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अप्पा कनवार, पोलीस कर्मचारी रवीकुमार, जीजाब, पांडूरंग उपलवाड, विठ्ठल खंडागळे यांनी केल़ी