|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?

नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला? 

ऑनलाईन टीम /  मुंबई : 

काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेसने  औरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज आहेत. त्यांनी झांबड यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे  जाहीर केले  होते. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात औरंगाबादसह 5 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबादमधीन सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केले. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे. लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी फिरलो. एल्गार यात्रा काढली. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. मात्र इतके  करुनही पक्षाने मला डावलले. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूकलढवणार असल्याचे  अब्दुल सत्तार यांनी काल स्पष्ट केले.