|Sunday, February 23, 2020
You are here: Home » leadingnews » पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद 

ऑनलाईन टीम /  श्रीनगर : 

 भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यानंतर झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. हरी वाकेर असे या जवानाचे  नाव असून ते गंभीर जखमी झाले होते. वाकेर यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (24 मार्च) मृत्यू झाला आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (22 मार्च) चकमक सुरू झाली होती. या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी सडेतोड उत्तर देत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत गेल्या 24 तासांत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये दोन दिवसांपूर्वी रफियाबाद याठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. सुरक्षा यंत्रणाचे या परिसरात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. या ग्रेनेड हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी हानी झाली नव्हती मात्र 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. मागील 4 दिवसांपासून या परिसरात सुरक्षा यंत्रणांची शोधमोहीम सुरु आहे. दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू आहे.

Related posts: