|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews » अंतराळात भारताचा स्ट्राइक; तीन मिनिटांत पाडले सॅटेलाइट

अंतराळात भारताचा स्ट्राइक; तीन मिनिटांत पाडले सॅटेलाइट 

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली :

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मोठी घोषणा केली आहे. भारताने  अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवल्याचे  मोदी म्हणाले आहेत. भारताने मिसाइलच्या सहाय्याने  उपग्रह पाडले  आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्याने  उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे.

काही वेळापूर्वीच आमच्या वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडले आहे. भारताने  अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचे  नाव नोंदवले असून, देशासाठी हा गर्वाचा दिवस आहे, असेही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करताना म्हणाले, अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतल्याने  भारताने  अवकाश संशोधन क्षेत्रात यश मिळाले आहे. 

 

Related posts: