|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews » उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अखेर काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. राजधनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन उर्मिलाने पक्षप्रवेश केला. उर्मिला काँग्रेसतर्फे मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

 

लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचे उर्मिलाने यावेळी सांगितले. काँग्रेसच्या विचारधरेवर विश्वास असल्यामुळे आपण पक्षप्रवेश केल्याचेही तिने सांगितले. उत्तर मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिले आहे. काँग्रेस शेट्टींविरोधत एका तगडय़ा उमेदवाराच्या शोधत होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावे चर्चेत होती.

 

1977 साली वयाच्या अवघ्या तिसऱया वषी उर्मिलाने ’कर्म’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरु केली. 1980 मध्ये श्रीराम लागूंसोबत झाकोळ चित्रपटातही ती झळकली. वयाच्या नवव्या वषी (1983) तिने शेखर कपूर यांच्या ‘मासूम’मध्ये केलेली भूमिका विशेष गाजली. ’लकडी की काठी…’ हे तिचे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

 

 

 

Related posts: