|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वैदिक वनसंपदा पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

वैदिक वनसंपदा पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन 

वार्ताहर/ निपाणी

अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात ज्ञानदानाची सेवा बजावणाऱया प्रा. डॉ. वर्षा संजय खुडे यांनी लिहिलेल्या वैदिक वनसंपदा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. हा प्रकाशन सोहळा मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. जय सामंत आणि डॉ. मधुकर बाचूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील, मोनेरा फाऊंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य बेर्डे, प्राचार्य डॉ. सुनील हेलकर आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. डॉ. वर्षा खुडे यांनी वैदिक वनसंपदा या पुस्तकातून प्राचीनकाळी ऋषिमुनींनी मांडलेल्या वनांच्या संकल्पनेची माहिती दिली आहे. वृक्षांचे जतन, रक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी देवराया, वैदिक वने निर्माण केली जात असत. वैदिक वनांमध्ये प्रामुख्याने नक्षत्र वाटिका, राशी वाटिका, नवग्रह वाटिका, सप्तर्षी वाटिका, पंचवटी यांचा समावेश होतो. अशा वैदिक वाटिका आपण औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संस्था, हॉटेल, मंदिरे, गावठाण जमीन, फार्महाऊस, माळरान, वनविभागाचे परीक्षेत्र परिसरात निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे परिसर हिरवागार होताना जलस्त्राsत वाढेल व वनपर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा संदेश देण्यात आला आहे.

या पुस्तकात नक्षत्र, राशी, गृह, सप्तर्षी या खगोलशास्त्राrय संकल्पनांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर या वैदिक वाटिका कशा निर्माण कराव्यात. त्याच्याशी निगडीत 52 वनस्पतींची शास्त्राrय माहिती, औषधी, सांस्कृतिक महत्त्व विशद केले आहे. हे पुस्तक निसर्गप्रेमी, आयुर्वेदप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांना उपयुक्त असून लाभदायक ठरणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. वर्षा खुडे यांनी दिली.