|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खातगुण उरुसासाठी सर्व सुविधा पुरविणार

खातगुण उरुसासाठी सर्व सुविधा पुरविणार 

वार्ताहर /खटाव :

खातगुण उरूसचा (झेंडा) व पालखी रविवार 31 रोजी  हा मुख्य दिवस असून खातगुण ग्रामपंचायत व देवस्थानकडून सर्व सुविधा पुरवणार असल्याची माहिती सरपंच अनिल साठे उपसरपंच रवींद्र लावंड यांनी दिली.

यावेळी देवस्थानचे विश्वस्त भानुदास शिवाजी लावंड, रामदास राजाराम लावंड, संपत कृष्णाजी लावंड, रमेश लावंड, यात्रा कमिटीचे चेअरमन शबाना इनामदार, व्हाईस चेअरमन नीता मदने, ग्रामसेवक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.  हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला खातगुण उरूसला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छ मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. दुकांदारांसाठी जागेचे, पाण्याचे, लाईट, नियोजन केले असून करमणुकीची साधने, पाळणे, सौन्दर्य प्रसाधने दुकाने आदींनी यात्रा फुलून गेली आहे तर चालू वर्षांपासून घोडय़ांचा बाजार भरवण्यात आला आहे. तसेच विविध प्रकारच्या जातिवंत घोडे पाहण्याची संधी लोकांना मिळणार आहे.               देवस्थानच्यावतीने शिस्तबद्ध नियोजन केले असून भाविकांनी रांगेत दर्शन घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

 

Related posts: