|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या भेटीला

सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या भेटीला 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट नियोजित होती, तसेच दोघांमध्ये सकाळी 10.45 ते 11.15 दरम्यान अर्धा तास चर्चा देखील झाली.

 

सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना सचिनने घेतलेल्या या भेटीचा अनेक जण राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. खासगी कारणांसाठी ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे.