|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » ‘जौश-ए-मोहम्मद’च्या फैयाज अहमदला अटक

‘जौश-ए-मोहम्मद’च्या फैयाज अहमदला अटक 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जैश- ए- मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी फैयाज अहमद लोन याला जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर येथे अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

फैयाज अहमद याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्या विरोधात आजीमानपात्र वॉरंट जारी केले होते. तो 2015 पासून स्वतःला अटक होण्यापासून वाचवित होता. अखेर त्याला श्रीनगरमध्ये जेरबंद केले आहे. दरम्यान, पुलवामामध्ये सुरक्षा दलाने आज मोठी कारवाई करत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामा जिह्यातील लस्सीपोरा भागात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांना मारले आहे. ते सर्व लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 

 

 

Related posts: